विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुगलबंदी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (NCP Leader Dhananjay Munde) यांना सणसणीत टोला लगावला आहे. धनंजय मुंडे घोषणाबाजी करताना एवढे ओरडत होते, की किती वर्षांचे शिवसैनिक (Shiv Sainik) आहेत असं वाटावं, पण तुमचाही इतिहास मला माहिती आहे, त्यावेळी आपल्या देवेंद्रजींनी (Devendra Fadnavis) थोडं प्रेम, दया, करुणा दाखवली, असं एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. यावेळी करुणा या शब्दावरुन शिंदेंनी घेतलेल्या फिरकीवरुन सभागृहात एकच हशा पिकला.
#EknathShinde #DhananjayMunde #DevendraFadnavis #MonsoonSession #NCP #SharadPawar #Maharashtra #HWNews #Shivsena #BJP